The NeverEnding Steps
- Get link
- X
- Other Apps
कोकणातील निसर्गाचा खजिना: किल्ले निवती🚩
स्थान -किल्ले निवती,कोकण,महाराष्ट्र,४१६५२०,भारत.
https://goo.gl/maps/iPHS8SNSBc4NWzrTA
किल्ले निवती हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या दक्षिणेस दहा कि.मी. अंतरावर आहे. हा निवती गावाजवळ डोंगरावर वसला आहे.
किल्ल्याचा इतिहास🚩: सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यानंतर शिवाजी महाराजांनी तातडीने हा किल्ला बांधला.या किल्ल्याचा उपयोग कर्ली नदी व वेंगुर्ला बंदराच्या तपासणीसाठी केला गेला.ह्या किल्ल्याची पोस्ट नंतर सावंतवाडीच्या सावंतने पकडली. १७४८ मध्ये पोर्तुगीजांच्या अधीन काम करणाऱ्या इस्माईल खानने हा किल्ला ताब्यात घेतला. १७८७ मध्ये कोल्हापूरच्या करवीरकरांनी या पदाचा ताबा घेतला. १८०३ मध्ये तटबंदीचे नियंत्रण सावंत यांच्याकडे गेले.४ फेब्रुवारी १८१८ रोजी ब्रिटीश सैन्याच्या एच.एम. आयव्ही रायफल्सने हा किल्ला ताब्यात घेतला तेही,कोणत्याही अडथळ्याशिवाय.
कसे पोहोचालः सर्वात जवळचे शहर मालवण आहे जे
मुंबईपासून ५२६ कि.मी. अंतरावर आहे. हा किल्ला निवती आणि परुळे या गावादरम्यान आहे. मालवण आणि कुडाळ येथून निवती किल्ल्यासाठी
थेट बस आहेत. पुणे किंवा मुंबईहून, NH १७ वरून गूगल map करा. एनएच १७ मध्ये असताना कुडाळ-पिंगुळी येथून
उजवीकडे वळल्यावर परुळे येथून छोटा रस्ता
तुम्हाला निवतीकडे घेऊन जाईल. मालवणहून छोटे रस्तेही आहेत. आपल्याला फक्त विचारून प्रवास
सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे.
परुळे हून डोंगरमाथ्यावर
प्रवासाला सुरुवात केल्यावर तेथे 2 रस्ते आहेत म्हणून गोंधळ करू नका.किल्ले निवती
बीच (डावीकडे) 👈👈 आणि भोगवे बीच (उजवीकडे) 👉👉. डावा मार्ग निवडा आणि आपला प्रवास सुरू ठेवा. ←←←←←←←←←←←← 👈👈👈👈👈👈👈👈 ←←←←←←←←←←←←
पुढे गेल्यावर २ पायवाटा आहेत. डावीकडील वाट निवती किनाऱ्यावर आणि उजवीकडील डोंगर वाट निवती किल्ल्याकडे जाते. डाव्या बाजूला, डोंगराचा एक अरुंद भाग आहे जो समुद्राच्या दिशेने गेला आहे.बीच पूर्णपणे शांत आणि स्वच्छ आहे. गावात व्यावसायिक सुविधा उपलब्ध नाहीत. 👇👇👇👇
या बुरुजावरून कोकणच्या
सौंदर्याचे,डोळ्याचं पारण फेडणार एक निसर्गरम्य दालन खुले होते. डावीकडे अथांग
पसरलेल्या अरबी समुद्राची निळाई आणि भोगवे समुद्र किनाऱ्यावरील लाटांचे धवल नृत्य
आपल्या नजरेस खिळवून ठेवते.खुल्या डोळ्यांनी ते रम्य दृश्य जेवढे हृदयात साठवून
ठेवावे तेवढे कमीच💓......!
किल्ल्याच्या उजव्या बाजूने निवतीच्या किनाऱ्यावरील खडकांचे दिसणारे विलोभनीय दृश्य हि मनाला एक सुखद आनंद देऊन जाते. खरोखरच या ठिकाणी निसर्गाने सौंदर्य उधळण केली आहे म्हणण व्यर्थ ठरणार नाही.
Golden rock
निवती बीच
निवती किल्ल्यावरून दिसणारे विहंगम दृश्य :
✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋✋
राहण्याची व्यवस्था : इथे जवळपास स्थानिक मच्छीमारयांच्या छोट्या वस्तीनखेरीज
बाकी काही राहण्याची सोय नाही आहे. तुम्ही जर इथे एक दिवसीय ट्रीप प्लान करून येण्याच्या
बेतात असाल तर आवश्यक सामान सोबत घ्या.
मनुष्य वस्ती पासून दूर , निर्मनुष्य किनारा..🏖 म्हणजे एखादा प्रायव्हेट बीच..🏖स्वच्छ.. सुंदर.. नितळ.. आणि अगदी निवांत असा.. सिंधुदुर्गात राहून माणसांच्या गर्दीचा तिटकारा आल्यास किल्ले निवती आणि परीसराला एखादी धावती भेट द्यायला हरकत नाही..
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment